पोथरे येथील दिलीप  शिंदे यांचे अकस्मात निधन

करमाळा /संदेश  प्रतिनिधी
करमाळा,ता.१८:  पोथरे येथील रहिवासी दिलीप नामदेव शिंदे (वय ५६ ) यांचे काल सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, पाच भाऊ व दोन बहिणी   असा परिवार आहे.

दिलीप शिंदे हे सुरुवातीपासूनच अत्यंत कष्टाळू आणि मेहनती स्वभावाचे होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी दुसऱ्याच्या दुकानात काम करून आपली शेतीची प्रगती केली.
गावातील विविध सामाजिक, धार्मिक व सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. विशेषतः दिंडी सोहळ्यात त्यांचा मोठा सहभाग असायचा.  दिलीप शिंदे यांचे सर्वांशी आपुलकीचे संबंध होते.
त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असून, ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. दिपक शिंदे व संदेश शिंदे यांचे ते वडील होते.

error: Content is protected !!