झरे येथे चोरी- एक लाख ३१ हजाराचा मुद्देमाल लंपास - Saptahik Sandesh

झरे येथे चोरी- एक लाख ३१ हजाराचा मुद्देमाल लंपास

करमाळा : झरे येथे एकाच रात्री घरासमोर लावलेली मोटारसायकल सह घराबाहेर झोपलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली. या तीन घटनांमध्ये एकूण सुमारे 1 लाख 31 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
यात मोहन दगडू आवटे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की 17 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 10 वाजता त्यांची फॅशन प्रो मोटारसायकल घरासमोर हँडल लॉक करून लावली होती. 18 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 12.40 वाजता उठल्यानंतर मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. परिसरात व झरे गावात शोध घेतला; मात्र मोटारसायकल मिळून आली नाही.
दरम्यान, गावातील मंदा पोपट आमृळे व आदिका बाळासाहेब आमृळे त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र कोणीतरी हिसकावून नेल्याचे सांगितले. त्यामुळे अज्ञात चोरट्याने मोटारसायकलसह दोन्ही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे चोरून नेल्याची खात्री पटली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

error: Content is protected !!