रुईच्या म्हसोबा दर्शनासाठी गेलेला तरुण बेपत्ता

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा ता.२१: रुईच्या म्हसोबा (टेंभुर्णी) येथे दर्शनासाठी गेलेला ३० वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. खंडु विठोबा ढवळे (रा. सौंदे, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. त्याचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला असून, याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या तक्रारीनुसार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खुंड ढवळे हा रुईच्या म्हसोबा (टेंभुर्णी, ता. माढा) येथे दर्शनासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. सुरुवातीला एक-दोन दिवसांत परत येईल, असे कुटुंबीयांना वाटले. मात्र, दोन दिवस उलटूनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर त्याचा शोध न लागल्याने पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

