कासवाला जीवदान देत केम येथील बारवेत सोडले

केम(संजय जाधव): रस्त्यात आढळलेल्या कासवाला जीवदान देत कासवाला केम येथील उत्तरेश्वर मंदिराच्या बारवेत (क्षेमकुंड) सुरक्षितपणे सोडण्यात आले.

याबाबत हकीकत अशी की, केम येथील रहिवासी व प्रहार संघटनेचे  संपर्कप्रमुख सागर पवार हे सातारा येथील बैलगाडी शर्यतीवरून परतत असताना सातोली फाट्याजवळ यांना रस्त्यावर आढळले. यावेळी रस्त्यावरून गाड्यांची ये जा सुरू होती. अशावेळी या कासवाच्या अंगावरून वाहन जाण्याची देखील शक्यता होती. त्यामुळे पवार यांनी या कासवाला उचलून सुरक्षितपणे आपल्या सोबत घेतले. केम ला आल्यानंतर त्यांनी हे कासव आणल्याची माहिती गावातील इतर व्यक्तींना दिली. यानंतर त्यांनी कासवाला मंदिरात नेऊन त्याची पूजा केली आणि मंदिरातील क्षेमकुंड अर्थात बारवेत सोडून त्याला जीवदान दिले.

यावेळी ह.भ.प. कुंभार महाराज, रमेश महाराज, मारुती तळेकर, संतोष राऊत, पत्रकार संजय जाधव आदी उपस्थित होते. मुक्या जीवाप्रती दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल सागर पवार यांचे केम व परिसरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!