गुरुकुल पब्लिक स्कुलमधील अनुराधा राऊत हिचे राज्य योगासन स्पर्धेत यश.. - Saptahik Sandesh

गुरुकुल पब्लिक स्कुलमधील अनुराधा राऊत हिचे राज्य योगासन स्पर्धेत यश..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे यांच्या अंतर्गत आदर्श गुरुकुल विद्यालय पेठ वडगाव कोल्हापूर येथे २१ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्रातुन विविध विभागातून 500 योगासन खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून यामध्ये करमाळा शहरातील गुरुकुल पब्लिक स्कूलमधील अनुराधा पंकज राऊत हिने 17 वर्षाखालील मुलींच्या गटातून पुणे विभागातून सहभाग नोंदवला होता. त्या स्पर्धेत अनुराधा पंकज राऊत हिला राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सांघिक तिसरे विजेतेपद मिळाले आहे.

गुरुकुल पब्लिक स्कूल मधील योगासनाचे मुख्यप्रक्षिशक सागर शिरस्कर सर,तसेच संस्थेचे संस्थापक प्रा.नितीन भोगे व रेश्मा भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 2 वर्षे झाली योगासनचा सराव करीत आहे. याबद्दल सर्वांनी अनुराधा राऊत हिचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!