किरकोळ कारणावरून भाऊ व पुतण्याकडून बेदम मारहाण – पारेवाडी येथील प्रकार
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : तु माझ्याकडे का बघतोस.. असे म्हणून दमबाजी करून गजाने व दगडाने भावाने व पुतण्याने रविंद्र अरूण शिंदे (रा.पारेवाडी) यांना बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की ५ मे ला सकाळी नऊ वाजता मी केत्तूर नं. २ येथे दुधाचा रतीब घालण्यासाठी जात असताना माझा चुलत पुतण्या प्रजोत वसंत शिंदे याने आडविले व माझ्याकडे का बघतो.. असे म्हणून मला धमकी दिली. त्यानंतर मी माजी सरपंच महादेव पांढरे यांच्याकडे जाऊन झाला प्रकार सांगितला. त्यावेळी श्री. पांढरे यांनी माझा चुलत भाऊ वसंत शिंदे त्याचा मुलगा प्रजोत शिंदे यांना बोलावून घेतले. त्यावेळी हे दोघे साडेनऊ वाजता पांढरे यांच्या घरासमोर आले व आल्यानंतर त्यांनी काही समजण्याच्या आतच गजाने व दगडाने मारहाण करून जखमी केले. त्यावेळी माजी सरपंच महादेव पांढरे यांनी माझी सुटका केली. या प्रकरणी पोलीसांनी दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.