डुकरेवाडी येथे देशी दारू विक्रेत्यावर कारवाई
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : डुकरेवाडी (रावगाव) येथे बेकायदेशीर देशी दारू विक्री करणाऱ्यावर पोलीसांनी कारवाई केली आहे. हा प्रकार ९ मे ला दुपारी साडेतीन वाजता घडला आहे. यात पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत हरी गवळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की.. डुकरेवाडी येथे देशी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावर तेथे गेलो असता, कैलास छबा पवार (रा. डुकरेवाडी) हा त्याच्या घराच्या शेजारी देशीदारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडे संत्रा कंपनीच्या ८४० रूपयाच्या १२ बाटल्या सापडल्या आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.