करमाळ्यात व्हॉटसअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट - दोघांवर गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

करमाळ्यात व्हॉटसअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट – दोघांवर गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : करमाळा समाजकारण या व्हॉटस्अप ग्रुप वर दोन समाजात तेढ निर्माण होईल; अशी पोस्ट टाकल्याचे पोलीसांच्या लक्षात येताच ग्रुप ॲडमीन व पोस्ट टाकणाऱ्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत भारत ढवळे यांनी फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे, की १२ जुन रोजी करमाळा येथील शाम परशुराम सिंधी (रा. खडकपुरा, करमाळा) यांनी त्यांचा मोबाईल नं. ९४२०७०५०७५ यावरून त्यांच्या मोबाईलमधील करमाळा समाजकारण या व्हॉटसअप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकला. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होवू शकते. हा प्रकार चुकीचा असल्याने त्याविरूध्द फिर्याद देत आहे असे म्हटले आहे. त्यानंतर पोलीसांनी शाम सिंधी व ग्रुप ॲडमीन नितीन आढाव पाटील यांचे विरूध्द आयपीसी ५५५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!