करमाळा बसस्थानकातून पर्स पळवली – ३८ हजाराचा ऐवज लंपास..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : येथील बसस्थानकातून पिशवीत असलेली दागिणे व नोटांची पर्स चोरट्यांनी पळवली आहे. त्यातील ३८ हजाराचा ऐवज लंपास केला आहे.
हा प्रकार २८ जुलैला दुपारी तीनच्या दरम्यान येथील बसस्थानकातील फलाट क्र. १ वर घडला आहे. या प्रकरणी लक्ष्मण भगवंत नीळ (रा.निमगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की २८ जुलैला आम्ही बसस्थानकावर असताना माझी पत्नी लता हिच्या हातात काळ्या पिशवीत लहान पर्स ठेवली होती.
चोरट्यांनी ती पर्स लंपास केली आहे. त्यात ८ हजार रूपये रोख व ५ ग्रॅम सोन्याचे पेंडल असा एकूण ३८ हजाराचा ऐवज चोरट्याने पळविला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.