माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेच्या करमाळा तालुका मुख्यसंघटक पदी संजय कुलकर्णी यांची निवड - Saptahik Sandesh

माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेच्या करमाळा तालुका मुख्यसंघटक पदी संजय कुलकर्णी यांची निवड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – गुळसडी (ता. करमाळा) येथील संजयकुमार मधुकर कुलकर्णी यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या संघटनेच्या करमाळा तालुका मुख्यसंघटक पदी निवड झालेली आहे. यासंबंधी अधिकृत पत्र संघटनेचे अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी  श्री कुलकर्णी यांना दिले.

त्यांची ही निवड तीन वर्षासाठी झालेली आहे. याविषयी माहिती देताना श्री कुलकर्णी म्हणाले की, मी माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्याचा जनहितासाठी मी वापर करणार असून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम मी करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!