पल्लवी रणश्रृंगारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्याध्यक्ष पदी निवड
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम (ता.करमाळा) येथील पल्लवी सचिन रणश्रृंगारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (महिला आघाडी) तालुका कार्याध्यक्ष पदी निवड झाली. या निवडिचे पत्र जिल्हाध्यक्षा वर्षाराणी रमेश शिंदे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात एका कार्यक्रमात त्यांना दिले.
या वेळी करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय मामा शिंदे तालुका,अध्यक्ष भारत अवताडे, सुजित बागल सरपंच तानाजी झोळ, अॅड, अजित विघ्ने महिला आघाडी तालुका,अध्यक्षा शितल क्षीरसागर जि,अध्यक्ष युवा अभिषेक आव्हाड आदि उपस्थित होते. आगामी निवडणूकिच्या पक्ष वाढीसाठी तळागाळात जाऊन पक्षाचे ध्येयधोरण महिला आघाडीच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवावेत असा संदेश देण्यात आला आहे
या निवडी बद्दल पल्लवी रणश्रृंगारे म्हणाल्या राष्ट्रवादी क्राॅंगेस पक्षाने माझावर जी जबाबदारी सोपवली ती खंबीरपणे पार पाडेल. जास्तीजास्त महिला, राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्या करण्यासाठी व पक्ष वाढिसाठी प्रयत्न करणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. या निवडिचे केम येथे जोरदार स्वागत करण्यात आले.