रस्त्याच्या कारणावरून चौघांकडून तिघांना मारहाण.. - Saptahik Sandesh

रस्त्याच्या कारणावरून चौघांकडून तिघांना मारहाण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : रस्त्याच्या कारणावरून चौघाजणांनी तिघांना मारहाण केली आहे. हा प्रकार ९ मार्चला सकाळी नऊ वाजता वडशिवणे येथे घडला आहे. या प्रकरणी सलिम कांतीलाल मणेरी रा. वडशिवणे यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की ९ मार्चला सकाळी ९ वाजता वडशिवणे येथील आमच्या शेतात मी, माझे वडील कांतीलाल व आई शहिदा असे असताना तेथे नाना भगत, सचिन भगत, बापू भगत, व रोहित भगत असे चौघे आले व तु आम्हाला रस्त्याने जाऊ नको असे का म्हणाला म्हणून चाकुने, लाकडी काठीने व हाताने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलीसांनी चौघाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!