अनुराग वाघमोडे 8 वीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात प्रथम
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : युरिया खताच्या गोणीची 266 रुपये विक्री किंमत आहे यापेक्षा जास्त दराने युरिया विकला तर व्यापाऱ्यांना धारेवर धरले जाते मात्र आज आलेल्या कृषक भारती कंपनीचा कुर्बको युरिया व्यापाऱ्यांना 310 रुपया ला मिळत आहे, तो आता शेतकऱ्यांना विकायचा कितीला असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.
पंढरपूर येथे आज युरियाची रेल्वे गाडी आली होती या गाडीतून 250 रुपये प्रति दराने व्यापाऱ्यांना युरिया देण्यात आला मात्र व्यापाऱ्यांना हा युरिया, स्वखर्चाने घेऊन जावा असे कंपनीने सांगितले
वास्तविक पाहता युरिया खत व्यापाऱ्यांना दुकानात पोच देणे हे कंपन्यांची जबाबदारी आहे खत कंपन्यांना वाहतुकीसाठी केंद्र सरकार अनुदान देते मात्र बाजारात युरिया टंचाई आहे याचा फायदा घेत कंपन्यांनी कृषी विक्रेत्यांच्या माथी जास्त दराने युरिया मारला आहे
आज करमाळा येथील बिटरगाव येथील व्यापाऱ्याला प्रति गोणी 50 रुपये भाडे लागले कंपनीने रेल्वे स्टेशन 260 रुपये आणि युरिया दिला
वाहतूक हमाली मिळून व्यापाराच्या दुकानात 310 रुपयाला युरिया येऊन पडला
आता व्यापाऱ्यांनी हा युरिया केंद्र शासनाच्या निर्धारित 266 रुपये प्रमाणे कसा विकायचा असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे
व्यापाऱ्यांनी याबाबत तक्रार केली तर त्यांचा खत पुरवठा कंपन्या बंद करत आहेत
कंपन्यांचे पाप कृषी विक्रेत्यांच्या माथ्यावर फोडले जात असल्यामुळे व्यापारातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे पण कोणीही बोलण्यास तयार नाही
++++
महेश चिवटे
संचालक महाराष्ट्र फर्टीलायझर सीड्सडीलर असोसिएशन
+++
खत कंपन्यांनी अनुदानित खते व्यापाऱ्यांच्या गोडाऊनपर्यंत पोच द्यावी अशी केंद्र सरकारच्या सूचना आहेत यासाठी केंद्र सरकार वाहतुकीसाठी कोट्यावधी रुपये अनुदान देते
मात्र रासायनिक खताच्या टंचाईचा फायदा घेत काही कंपन्या रेल्वे स्टेशन वरूनच खत विकतात
यामुळे ट्रान्सपोर्ट हमाल इतर खर्च पन्नास रुपये गुणीपर्यंत जातो
जिल्हा कृषी अधीक्षक यांनी या प्रकरणात लक्ष घालावे
ज्या कंपन्या रासायनिक खत विक्रेत्यांच्या पोच देणार नाहीत अशा कंपन्यांचा म** खरेदी करायचा नाही अशा प्रकारची भूमिका आगामी काळात कृषी संघटना कृषी विक्रेते संघटना घेऊ शकते असा इशाराही चिवटे यांनी दिला आहे
अनुदानित रासायनिक खते विक्रेत्यांच्या दुकानापर्यंत पोहोच करणे ही कंपन्यांची जबाबदारी आहे असे असताना कंपन्या जर चुकीचे वागत असेल व व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना वेठीला धरत असतील तर कडक कारवाई करू!
– दत्तात्रय गवसने, जिल्हा कृषी अधीक्षक सोलापूर