उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धेत अनुष्का होरणेचे सुयश
केम(संजय जाधव) – शैक्षणिक वर्ष 2023-2024 उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत केम (ता.करमाळा) येथील श्री उत्तरेश्वर हायस्कूल मधील अनुष्का राजकुमार होरणे ही विद्यार्थिनी मेरिट मध्ये आल्याने तिला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ईझरो), आयआयटी कॉलेज, सायन्स सिटी अहमदाबाद आदी पाहण्याची संधी मिळणार आहे.
उत्तुंग तेज फाउंडेशनचे अध्यक्ष रामेश्वर हुलगे, परीक्षा प्रमुख चंद्रकांत शिंदे, प्रशालाचे मुख्याध्यापक कदम एस.बी सर यांनी अनुष्का राजकुमार होरणे या विद्यार्थिनीचा आणि पालक सौ माधुरी होरणे यांचा नारळ , श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. तसेच या विद्यार्थिनीला मार्गदर्शन करणारे श्री हिरवे एन.बी सर यांचाही सत्कार करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यानी या विदयाथींनीचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ग्रामीण भागात या विद्यार्थिनीने चांगले यश संपदन केल्यामुळे या विद्यार्थिनीचे केम व परिसरातून कौतूक होत आहे.
आ.संजयमामा शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्येच कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्याकडे निधीची मागणी केलेली होती, परंतु त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे तो विषय प्रलंबित होता. विद्यमान महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये आ.शिंदे यांनी 1 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधीची मागणी केली.
त्यानुसार सदर प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून जलसंपदा विभागाला सादर झालेला असून त्यामध्ये कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी 47 लक्ष निधीची मागणी केली आहे.
अशी असेल कुकडी उजनी उपसा सिंचन योजना…
आमदार संजयमामा शिंदे यांची संकल्पनेनुसार प्रस्तावित केलेली कुकडी उजनी उपसा सिंचन योजना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून दोन टप्प्यांमध्ये प्रस्तावित केलेली आहे.
टप्पा 1 –
रिटेवाडी येथून पाणी उचलून ते मोरवड येथील कुकडीच्या अस्तित्वातील कॅनॉल मध्ये टाकले जाईल. हे अंतर 20.13 किमी आहे त्यासाठी 18 00 मी मी व्यासाच्या 2 समांतर पाईपलाईन व 32 34 अश्वशक्ती क्षमतेचे 8 विद्युत पंप सुचविलेले आहेत. या पहिल्या टप्प्यातील योजनेमधून 18472 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.
टप्पा 2 –
या टप्प्यात केतुर येथून पाणी उचलून ते सावडी येथील कुकडीच्या अस्तित्वातील कॅनॉलमध्ये टाकले जाईल. हे अंतर 17.60 किलोमीटर असून त्यासाठी 800 मी मी व्यासाची 1 पाईपलाईन सुचविलेली आहे. सदर पाणी उचलण्यासाठी 3100 अश्वशक्तीचे 4 विद्युत पंप सुचविलेले आहेत. सदर टप्प्यावरून 5790 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित आहे.