माध्यमिक शाळांमध्ये आमदार फंड किंवा जिल्हा नियोजन मंडळातून सीसीटीव्ही बसवणार : आमदार शिंदे

करमाळा (दि.८) – शासनाने जारी केलेल्या निर्णयानूसार तालुक्यातील माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची गरज आहे. संबंधित शाळांकडे निधी उपलब्ध नाही. याकरीता आमदार फंड तसेच जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून शाळेत सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन करू; असे आश्वासन आमदार संजयमामा शिंदे यांनी दिले.

विठ्ठलराव शिंदे सांस्कृतिक मंडळ निमगाव (टें) या संस्थेच्या वतीने करमाळा तालुक्यातील आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, आदर्श क्रिडा शिक्षक, आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी यांना पुरस्कार जाहीर केले होते. त्या पुरस्काराचे वितरण आ. शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप तसेच विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अॅड. बाबूराव हिरडे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक सुनील शिंदे, एस.एम.शिंदे, योगेश दळवे, नानासाहेब आढाव आदींनी केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजकुमार खाडे यांनी केले.
पुढे बोलताना आमदार शिंदे यांनी विनाअनुदानित शाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांचे कौतूक करत त्यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. तसेच प्रत्येक शाळेतील वाचनालय समृध्द करू. जुन्या पेन्शनसाठी प्रयत्नशील राहु. अशी आश्वासने यावेळी दिली.
यावेळी शिक्षणाधिकारी जगताप, प्राचार्य कदम, अॅड. हिरडे, श्रीपाद दळवे, शिक्षक भारतीचे जाधव आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्र ठोंबरे यांनी केले. आभार सिध्देश्वर हायस्कुलचे मुख्याध्यापक जगदाळे यांनी मानले.
यावेळी पुढीलप्रमाणे पुरस्कार देण्यात आले आहे
- आदर्श शाळा – लालबहाद्दुर शास्त्री विद्यालय सालसे, गुरुकुल पब्लिक स्कुल श्रीदेवीचामाळ – पांडे, छत्रपती शिवाजी विद्यालय वीट, छत्रपती शिवाजी विद्यालय कोर्टी, त्रिमुर्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी, नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केत्तूर, नामदेवराव जगताप विद्यालय झरे, श्री अवधूत विद्यालय वांगी नं. २, साडे हायस्कुल साडे, कण्वमुनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कंदर, दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय कुंभेज, राजाभाऊ तळेकर विद्यालय केम, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव, कमलादेवी कन्या प्रशाला करमाळा.
- आदर्श मुख्याध्यपाक – गौतम विष्णू सांगडे (डॉ. हेगडेवार विद्यालय गौंडरे), नवनाथ कुंडलिक मोहोळकर (म.फुले विद्यालय मोरवड), अनिल सोपान झोळ ( श्री राजेश्वर विद्यालय राजुरी), बाळू नामदेव काटे (एस.यु. राजेभोसले विद्यालय जिंती), रमेश रूद्रा यादव (शरदचंद्रजी पवार विद्यालय वाशिंबे), सुनिल महादेव सातव (वामनराव बदे विद्यालय उमरड), दिलीप हरीबा वायदंडे ( श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालय चिखलठाण), संतोष मच्छिंद्र नुस्ते (मच्छिंद्र नुस्ते विद्यालय कविटगाव), कांतीलाल लक्ष्मण माने (आदिनाथ माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय आदिनाथनगर), भिमराव राजाराम भोसले (अजितदादा पवार विद्यालय वडशिवणे), सुनिलकुमार जनार्धन जाधव (कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा).
- आदर्श शिक्षक – शरद यादवराव घाडगे (श्री संगमेश्वर विद्यालय संगोबा), बाळासाहेब काशिनाथ फंड (सिध्देश्वर विद्यालय हिसरे), सुनिल सुखदेव खटावकर (विठामाई माध्य विद्यालय गुळसडी), नितीनकुमार दिगंबर कांबळे (दिगंबरराव बागल विद्यालय सावडी), अक्षता सुधाकर पांढरे (कृष्णाई इंटरनॅशनल इंग्लिश मेडियम स्कुल कात्रज), सतीश आनंदराव जगताप (शरदचंद्र पवार विद्यालय कुंभारगाव), विकास बलभिम पवार (वामनराव बदे विद्यालय उमरड), रहिम रोखलाल तांबोळी ( मच्छिंद्र नुस्ते विद्यालय कविटगाव), विजयकुमार पोपट माने (शारदाताई गोविंदराव पवार विद्यालय केम), विजयकुमार दत्तात्रय धनवे (कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा), सचिन वसंतराव गाडेकर (साडे हायस्कुल साडे), विष्णू गजेंद्र काळे (नूतन माध्य व उच्च माध्य विद्यालय केम), धनंजय विठ्ठल चव्हाण (नामदेवराव जगताप विद्यालय झरे)
- आदर्श क्रिडा शिक्षक – दादासाहेब मारूती बरडे (छत्रपती शिवाजी विद्यालय वीट), मारूती संदिपान साखरे (श्री राजेश्वर विद्यालय राजुरी), ईश्वर बापूराव तोरडमल (त्रिमुर्ती माध्य व उच्च माध्य विद्यालय टाकळी), श्रीकृष्ण उत्तमराव ढेरे (छत्रपती संभाजी विद्यालय निंभोरे), जितेंद्र कुंडलिक शिंदे (गिरधरदास देवी विद्यालय करमाळा)
- गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी – शशिधर चर्तुभूज गिरी (सरस्वती विद्यालय वरकुटे), राजेंद्र कारभारी नाळे (म.फुले विद्यालय मोरवड), नानासाहेब नामदेव भालशंकर ( शरदचंद्र पवार विद्यालय कुंभारगाव), राजेंद्र उगलमोगले ( भिलारवाडी माध्यमिक विद्यालय), कल्याण सदाशिव साळुंखे (शरदचंद्रजी पवार विद्यालय वाशिंबे), रामचंद्र आप्पाराव तळेकर (राजाभाऊ तळेकर विद्यालय केम), सुरेश अंबादास बरडे (पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव), रविंद्र कल्याण शिंदे (कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा)





