जेऊर येथे १ डिसेंबरला महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर; तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार तपासणी - Saptahik Sandesh

जेऊर येथे १ डिसेंबरला महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर; तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार तपासणी

करमाळा : संदेश प्रतिनिधी

तालुक्यातील जेऊर येथे सोमवार, १ डिसेंबर रोजी महिलांसाठी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जेऊर येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर पार पडणार असल्याची माहिती शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा पद्मजा इंगवले यांनी दिली.

या शिबिरात महिलांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यासह रक्त तपासणी, ईसीजी, गर्भवती व स्तनदा मातांची तपासणी, गर्भाशय व स्तन कर्करोग तपासणी, डोळ्यांची तपासणी तसेच अस्थिरोगासह विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
या शिबिरासाठी अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश राऊत, बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल डुकरे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता बंडगर तसेच नेत्रचिकित्सा अधिकारी रामानंद चालाक व प्रियांका चालाक उपस्थित राहून रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.

महिलांच्या आरोग्यविषयक समस्या वेळीच निदर्शनास येऊन त्यावर योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा पद्मजा इंगवले यांनी केले आहे.

error: Content is protected !!