पोफळज येथे १९ हजाराची चोरी

करमाळा : पोफळज येथील बंद घराचा दरवाजा उघडून कपाटातील रोख रक्कम पाच हजार व १४ हजार किंमतीचे सोन्याचे दागिणे असा १९ हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार २३ मे च्या मध्यरात्री घडला आहे. मे

या प्रकरणी उत्तरेश्वर वाल्मिक कांबळे (रा. पोफळज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी पोफळज येथे राहत असून दहिगाव येथे आमची शेती आहे. २३ मे ला मी कामानिमित्ताने नागपूरला गेलो होतो. त्यावेळी माझी पत्नी व मुले दहिगाव येथील शेतात थांबले होते. पोफळज येथे घरी कोणी नाही पाहून रात्री चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून दरवाजा उघडून कपाटातील रोख पाच हजार रूपये तसेच १४ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे ३० मणी चोरून नेले आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.




