लिंबेवाडी येथील अभिजीत जायभाय हे  साऊथ कोरिया ला रवाना -

लिंबेवाडी येथील अभिजीत जायभाय हे  साऊथ कोरिया ला रवाना

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१६:  लिंबेवाडी येथील सुपुत्र अभिजीत मच्छिंद्र जायभाय यांची पुणे येथील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी बॉब्स्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी साऊथ कोरिया येथील महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे.  त्या प्रकल्पासाठी ते साऊथ कोरीयाला रवाना झाले आहेत.

जायभाय यांच्या या निवडीमुळे करमाळा तालुक्याचा शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात पुन्हा एकदा गौरव वाढला आहे.
या प्रकल्पामध्ये अभिजीत जायभाय हे पॅकेजिंग मशीनच्या प्रोटोटाइप बिल्डिंगसाठी भारतीय टीमचे नेतृत्व करणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अभिजीत जायभाय यांनी यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे. त्यांनी स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि चीन या देशांमध्ये SAP व लीन मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर यशस्वीपणे काम केले आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण आदिनाथ कारखाना परिसरात झाले असून, माध्यमिक शिक्षण लोकमान्य टिळक विद्यालय, कराड येथे पूर्ण केले. पुढे त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथून अभियांत्रिकी पदवी संपादन केली.
त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, तरुण पिढीसाठी ते एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!