केम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता वायभासे यांची निवड

केम(संजय जाधव): केम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता शरद वायभासे यांची निवड करण्यात आली असून गटनेतेपदी सागर कुरडे यांचीही निवड करण्यात आली आहे.

निवडीनंतर आयोजित कार्यक्रमात अच्युत पाटील, विष्णू पारखे, सागर राजे दौंड, महावीर तळेकर, बाळासाहेब देवकर, संदीप तळेकर, महेश तळेकर, दादासाहेब गोडसे, दिलीप दौंड, विलास बीचीतकर, आनंद शिंदे, सागरराज तळेकर, बापू तळेकर, सचिन काळे, सुलतान मुलाणी, योगेश ओहोळ, निखिल तळेकर, राजेंद्र देवकर, सोमा यादव, राहुल वायभासे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच ग्रामपंचायत सदस्य गोरख पारखे, दत्तात्रय बीचीतकर, विजयसिंह ओहोळ, अन्वरनबी मुलाणी, अलका गोडसे, वंदना तळेकर, ऋतुजा ओहोळ, कमल अवघडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.


