श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू

0

करमाळा (प्रतिनिधी): करमाळा शहरात सामाजिक ऐक्य, मानवता आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची तयारी उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाली आहे. रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी होणाऱ्या या भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज चांदगुडे प्लॉट , बायपास रोड करमाळा येथे विधिवत पूजा करून मैदान स्वच्छता व मंडप उभारणीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ चिवटे यांनी बोलताना सांगितले की, हा विवाह सोहळा केवळ लग्न समारंभ नसून गरजू कुटुंबांना आधार देणारा, त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारा आणि समाजात एकोप्याचा संदेश देणारा उपक्रम आहे. प्रत्येक वधू-वराने आनंदाने संसाराची सुरुवात करावी ही श्रीराम प्रतिष्ठानची भावना असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम दरवर्षी अधिक भव्य होत आहे. श्रीराम प्रतिष्ठानचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःच्या घरचा समारंभ समजून या सोहळ्यासाठी परिश्रम घेत आहे.

यंदा हा विवाह सोहळा चौथ्या वर्षात पदार्पण करत असून अधिक नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळत असून तालुक्यात सर्वत्र या सामुदायिक विवाह सोहळ्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
यावेळी  महाराष्ट्र चॅम्पियन अफसर तात्या जाधव, नगरसेवक रामभाऊ ढाणे, विजय घोलप, उद्योगपती राजूकाका शीयाळ, भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय घोरपडे, विलास जाधव, भीष्माचार्य चांदणे, बाळासाहेब गोरे गुरुजी, अमोल पवार, नितीन झिंजाडे, सोमनाथ घाडगे, सचिन गायकवाड, बंडू शिंदे, दादा देवकर, जयंत काळे पाटील, दिनेश मडके, नितीन निकम, सचिन भणगे, प्रमोद फंड, बाबा घोडके, स्वानंद वांगडे, हर्षद गाडे, संजय दुर्गुळे, राजेश पाटील, वसिम सय्यद, अशोक मोरे, संदीप काळे, गणेश गोसावी, विनोदी इंदलकर, भरत गुंड, संदीप रेगुडे, महेश दिवाण, प्रसाद कोकीळ, शैलेश राजमाने तसेच श्रीराम प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य व सामाजिक कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!