रस्त्यावर उभे राहण्याच्या कारणावरून वाद; तिघांकडून युवकासह कुटुंबीयांना मारहाण

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी:
करमाळा ता. १८ : शेटफळ परिसरात रस्त्यावर उभे असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी एका युवकासह त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात अमोल राजेंद्र गायकवाड (रा. चिखलठाण नं. १) यांनी फिर्याद दिली. त्यात त्यांनी म्हटले की १७ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास शेटफळ येथील दूध डेअरीजवळ मी व दादा लबडे उभे असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांशी वाद झाला. त्यानंतर तुषार भागवत रोकडे, ओंकार नवनाथ कांबळे व प्रथमेश नावाच्या युवकाने त्यांना मारहाण केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी आलेल्या अमोल गायकवाड यांचा भाऊ अक्षय गायकवाड व आई सविता गायकवाड यांनाही मारहाण करण्यात आली आहे. तसेच आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या झटापटीत अमोल गायकवाड यांच्या नाकाला दुखापत झाली असून त्यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याचे पेंडल गहाळ झाला आहे. यात वरील तिघा विरुद्ध करमाळा पोलीसात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!