झाडू हाती घेत केम ग्रामस्थांकडून उत्तरेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता -  तरुणांनी केला स्वच्छतेचा संकल्प -

झाडू हाती घेत केम ग्रामस्थांकडून उत्तरेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता –  तरुणांनी केला स्वच्छतेचा संकल्प

0

केम(संजय जाधव):   केम गावचे ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे परिसर विद्रुप झाला होता त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत हा परिसर स्वच्छ करण्याचे ठरविले.

ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ग्रामस्थांनी हातात झाडू घेत मंदिर परिसर, तसेच ओढ्याशेजारी साचलेला प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून कचरा गाडीत टाकला. त्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या श्रमदानामुळे श्री उत्तरेश्वर मंदिर परिसर स्वच्छ आणि सुंदर झाला असून, भाविक व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या उपक्रमाचे केम येथील नागरिकांनी मनापासून स्वागत व कौतुक केले आहे.

या उपक्रमामागे कोणतेही राजकारण नसून आपले केम स्वच्छ व सुंदर ठेवणे हा संकल्प असल्याचे सहभागी तरुणांनी सांगितले. यापुढे देखील अशाच प्रकारे दर रविवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत गावातील सार्वजनिक ठिकाणी श्रमदान करण्याचा संकल्प यावेळी ग्रामस्थांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!