साडे महसूल अधिकाऱ्यास मारहाण,- शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा , ता.१६ : साडे येथील तलाठी कार्यालयात सातबारा उताऱ्यावर हाताने पीक-पाणी नोंद करून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून ग्राम महसूल अधिकाऱ्यास शिवीगाळ, मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना १३ जुलै रोजी सकाळी सुमारे ९.४५ वाजता घडली.

याप्रकरणी साडे येथील ग्राम महसूल अधिकारी परमेश्वर सुधाकर सलगर यांनी करमाळा पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, मी साडे येथील तलाठी कार्यालयात कामकाज करत असताना गावातील ज्योतीराम पांडुरंग कदम हा सातबारा उताऱ्यावर हाताने पीक-पाणी नोंद करून देण्याची मागणी करत होता . त्यास शासनाच्या नियमानुसार अशी नोंद संबंधित मोबाईल ॲपद्वारेच करावी लागते, असे सांगितल्यानंतर त्याने कार्यालयात गोंधळ घालत आम्हाला कार्यालयाबाहेर बाहेर काढले व कार्यालयाला कुलूप लावले .

त्यानंतर आम्ही तलाठी कार्यालयाबाहेर उभे असताना आरोपीने शिवीगाळ करत गालावर चापट मारली तसेच “तू तलाठी कार्यालयात कसा येतो ते मी बघतो,” अशी धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!