प्रा. डॉ. महेश निकत यांची 'नॅशनल आयडियल टीचर अवॉर्ड' साठी निवड -

प्रा. डॉ. महेश निकत यांची ‘नॅशनल आयडियल टीचर अवॉर्ड’ साठी निवड

0

करमाळा(प्रतिनिधी): करमाळ्यातील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक व संचालक प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र निकत यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांची ‘National Ideal Teacher Awards 2026’ साठी निवड करण्यात आली आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दि. 2 ऑगस्ट 2026 रोजी पुणे येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

प्रा. डॉ. महेश निकत यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विशेषतः गणित विषयाचे प्रभावी अध्यापन तसेच MHT-CET, JEE आणि NEET यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन देऊन अनेक विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवला आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल  विद्यार्थी, पालक आणि करमाळा तालुक्यातून प्रा. निकत यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!