६२ व्या वर्षीही धावण्याची जिद्द; राजेंद्र रणसिंग यांची हाफ मॅरेथॉनमध्ये उल्लेखनीय कामगिरी -

६२ व्या वर्षीही धावण्याची जिद्द; राजेंद्र रणसिंग यांची हाफ मॅरेथॉनमध्ये उल्लेखनीय कामगिरी

0

करमाळा(दि.२६): पुणे येथे १२ जुलै २०२६ रोजी आयोजित GPMHM 2026 (Alpha Racing Solutions) या प्रतिष्ठित…

करमाळा(दि.२६): पुणे येथे १२ जुलै २०२६ रोजी आयोजित GPMHM 2026 (Alpha Racing Solutions) या प्रतिष्ठित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत करमाळा तालुक्यातील खातगाव येथील राजेंद्र नारायण रणसिंग यांनी ४५ वर्षांवरील हाफ मॅरेथॉन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत  द्वितीय क्रमांक (Runner-Up) पटकावला. ५ किलोमीटरची असलेली ही स्पर्धा रणसिंग यांनी अवघ्या ३२ मिनिटे ३२ सेकंदांत पूर्ण केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना आकर्षक ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. वयाच्या वय ६२ व्या वर्षी त्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



६२ व्या वर्षीही नियमित व्यायाम, शिस्तबद्ध जीवनशैली, कठोर सराव आणि जिंकण्याची जिद्द यांच्या जोरावर रणसिंग यांनी तरुणांनाही प्रेरणा देणारी कामगिरी केली आहे. “वयामुळे स्वप्नांना मर्यादा येत नाहीत; मनात जिद्द आणि कृतीत सातत्य असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते,” हा संदेश त्यांच्या यशातून अधोरेखित होतो.



राजेंद्र रणसिंग यांच्या यशामुळे आरोग्यदायी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि फिटनेसकडे वाटचाल करण्यासाठी अनेकांना प्रेरणा मिळत आहे. श्री.रणसिंग हे सोलापूर DCC बँकेतून बँक निरीक्षक (इन्स्पेक्टर) म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. योग्य आहार, व्यायाम, शेतीमध्येही मेहनतीची कामे यातून त्यांचा फिटनेस टिकून राहिला आहे असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!