केम येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

0

केम | संजय जाधव: करमाळा तालुक्यातील केम येथील प्राथमिक आश्रमशाळा व माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विघ्नहर्ता सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सागराजे दशरथ तळेकर व त्यांच्या मित्र परिवाराच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी बोलताना युवा कार्यकर्ते सागराजे तळेकर यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासात चिकाटी, जिद्द व सातत्य ठेवून यश संपादन करावे, असे आवाहन केले. तसेच शाळेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास शिक्षण प्रसार मंडळाचे चेअरमन श्री. सुदर्शन तळेकर, मुख्याध्यापक श्री. जगताप सर, श्री. महादेव पाठमस, श्री. आण्णा घोडके, श्री. वसंत तळेकर, श्री. बालाजी तळेकर, श्री. नागेश सुरवसे, श्री. भिताडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वाघमोडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. जगताप यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!