रोशेवाडीत किरकोळ कारणावरून तरुणास मारहाण

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२८ : रोशेवाडी येथे शेतीतील पिकाच्या नुकसानीच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणास व त्याच्या वडिलांना मारहाण केल्याची घटना 24 जुलै रोजी घडली. या हल्ल्यात गणेश अंबादास गोरे (वय 37) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेतातील बैल मक्याच्या पिकात शिरल्याच्या कारणावरून नामदेव गोरे यांनी लाकडी काठीने, तर प्रविण गोरे यांनी उसतोडणीच्या लोखंडी हत्याराने गणेश गोरे यांच्या डोक्यावर वार केल्याने त्यांच्या डोक्याला दोन ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या वडिलांनाही मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!