‘शब्दबाज’ ओपन माईकला कवी-रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी: करमाळा, दि. ३ :यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथील विजयश्री सभागृहात आयोजित…

करमाळा / संदेश प्रतिनिधी:

करमाळा, दि. ३ :
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथील विजयश्री सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘शब्दबाज’ ओपन माईक या काव्य उपक्रमाला कवी व रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी सुरेश शिंदे, प्रकाश लावंड व इतर मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी नवनाथ खरात यांनी केले.
यावेळी कवी सुरेश शिंदे, कवी प्रकाश लावंड आणि संतोष मंजुळे यांनी मनोगत व्यक्त करत साहित्य संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विशद केले.

यानंतर कवींनी आपल्या स्वलिखित कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. यामध्ये सुजाता अनारसे, प्रणिता काटोळे, गौरी पिसे, हरीभाऊ हिरडे, भारत जाधव, दीपक लांडगे, सुहास आगलावे, सोनल कुलकर्णी, विकास नाईक पवार, ओंकार सरवदे, प्रतिमा गुडवे, ॲड.प्राची सरवदे, अमित सरवदे, तेजस धेंडे, राजेश्वरी जगदाळे, ऋतुजा हुलगे, महाराष्ट्र पोलीस संदीप हुलगे, खलील शेख, प्रा. मुक्ता महाडिक, अनिता देशमुख, पौर्णिमा ढवळे आणि प्रा. चारू देवकर यांनी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमास हारून शेख (नायब तहसीलदार),भारत वांगडे, प्रा. सुरेखा जाधव,बाळासाहेब गोरे ,  कोमल लांडगे, मदिहा शेख, सोमनाथ टकले, निकम महाराज हिवरे, तलाठी कुलकर्णी साहेब,शिवानी करंडे आणि प्रा. दीपक सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती व सहकार्य लाभली.

कार्यक्रमाचे आयोजक ” शब्दबाज ” ग्रुपमधील कवी खलील शेख , प्रा. अमित सरवदे, ॲड.प्राची सरवदे, तेजस धेंडे, शीतल नाईक, राजेश्वरी जगदाळे, दीपक सोनवणे,प्रतिमा गुडवे, दीपाली राऊत, ओंकार सरवदे,ऋतुजा हुलगे , संदीप हुलगे, प्रणिता काटोळे यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!