कंदर येथे मुरुमाच्या वादातून धारदार शस्त्रांनी हल्ला

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.७:
कंदर येथे शेतजमिनीवरील मुरूम काढण्याच्या कारणावरून मुदस्सर मुमताज जहागीरदार यांच्यावर धारदार शस्त्राने व दगडाने हल्ला झाल्याची घटना २६ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
यात मुदस्सर मुमताज जहागीरदार यांनी फिर्याद दिली. त्यात त्यांनी म्हटले, की
आमचे शेतातील वस्तीच्या जागेवर टाकलेला मुरूम जेसीबीच्या सहाय्याने काढत असताना समीर रशीद पठाण व आयशा समीर पठाण हे तेथे आले. त्यांनी यावेळी कारण नसतानक वाद निर्माण केला. आयशा पठाण यांनी मला मारहाण केली, तर समीर पठाण यांनी कत्तीने वार केला. घटनास्थळी आलेल्या लालासाहेब गुलमंहमद मुलाणी, शाहरुख लालासो मुलाणी, मौला गुलमंहमद मुलाणी व सायरा मौला मुलाणी यांनीही हल्ल्यात सहभाग घेऊन मारहाण केली. शाहरुख मुलाणी यांनी सुरीने, तर लालासाहेब मुलाणी यांनी दगडाने वार करून जखमी केले. याप्रकरणात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.




