स्वच्छतेतून सामाजिक बांधिलकीचा संदेश; मौलाना अबुल कलाम आझाद फाऊंडेशनचा उपक्रम.. -

स्वच्छतेतून सामाजिक बांधिलकीचा संदेश; मौलाना अबुल कलाम आझाद फाऊंडेशनचा उपक्रम..

0

करमाळा : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील कै. कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या परिसरात मौलाना अबुल कलाम…

करमाळा : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील कै. कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या परिसरात मौलाना अबुल कलाम आझाद फाऊंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला.

यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा मुस्लिम समाजाचे युवा नेते अल्लाउद्दीन शेख (आलू शेठ) यांनी स्वच्छतेचे महत्त्व विशद करताना, “स्वच्छ परिसर ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून आणि आपल्या परिसरापासून झाली पाहिजे,” असे आवाहन केले. या उपक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव, आकुंश खाने, जगदाळे, विजय धनवे, जितेश कांबळे, शुभम पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.

तसेच उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर शेख, उपाध्यक्ष मतीन शेख, खजिनदार आलीम शेख, सद्दाम मुलानी, फाऊंडेशनचे उपाध्यक्ष वाजीद शेख, सचिव मजहर नालबंद, मतीन शेख, आलीम शेख, सादिक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!