श्री कमलाभवानी नवरात्र महोत्सवाचे निमित्ताने….

भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्याकालावधीत नवरात्र उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी आश्विन महिन्यातील प्रतिपदेपासून ते विजयादशमी या कालावधीतील नवदुर्गा देवीच्या नवरात्रौत्सवाला विशेष असे महत्त्व आहे नवरात्र हा उत्सव फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे नवरात्र उत्सवाची प्रथा कृषी विषयक स्वरूप व्यक्त करते तसेच या उत्सवाचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण असून नवरात्र काळ भगवती देवीच्या उपासनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो  नवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र उत्सव मानला जातो  असत्यावर सत्याचा विजय हा प्रामुख्याने नवरात्र उत्सवाचा केंद्रबिंदू आहे नवरात्रात विशेष करून देवीची उपासना करायला पाहिजे आश्विन या पवित्र महिन्यात भक्तीपूर्वक देवीची आराधना व्हायला पाहिजे नवरात्रात देवीच्या नऊ रूपाचे पूजन स्मरण केले जाते देवी भगवतीच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असे म्हणतात दुसऱ्या रूपाला ब्रह्मचारींनी तिसऱ्या रुपाला चंद्रघंटा चौथ्याला कृष्मांडा पाचव्या रूपाला स्कंदमाता सहाव्याला कात्यायनी सातव्याला कालरात्री, आठव्याला महागौरी, नवव्याला सिद्धीदात्री अशा या नऊ दिवसाच्या नऊ रूपामध्ये देवी वावरत असते आणि दहाव्या दिवशी ती शुंभनिशुंभ या राक्षसांचा वध करण्यास सज्ज होऊन सीमोल्लंघन करते अशा या देवीचे नऊ रूप आपण  बघितल्यानंतर देवीचे नऊ दिवसाचे आपल्या घरातले मंगलमय वास्तव असते त्यात कोणी पूर्ण उपवास एकभूक्त  किंवा यापैकी एका व्रताचा नियम करून देवीची आराधना करतात  नवरात्र उत्सवामध्ये उपासनेला विशेष महत्त्व आहे या काळामध्ये केलेली उपासना नित्य दुर्गासप्तशती पठण यामुळे इच्छित फलप्राप्ती होते मन शांत ठेवून आणि आनंदाने देवीची आराधना करावी.               करमाळा येथील प्रसिद्ध श्री कमलाभवानी मंदिरात   नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी चालू असून मंदिर व परिसर स्वच्छता देवराई ग्रुप या ज्येष्ठ नागरिकांनी संपन्न केली आहे    भवानी मातेच्या दर्शनाला नऊ दिवस येणाऱ्या भाविकांनी मंदिर स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे आपल्यामुळे मंदिर अस्वच्छ होणार नाही याची सर्वांनी जबाबदारी व भान ठेवावे मंदिर परिसरात मोबाईलवर मोठ्या आवाजात संभाषण करणे इतर भक्तांना त्रास होईल असे वर्तन करणे पूर्णतः वर्ज करावे. आपल्या शक्य असेल ती गरिबांना मदत करावी त्यामुळे देवीची कृपा आपल्यावर राहण्यास मदत होणार आहे .              नवरात्र उत्सव हा स्त्रीशक्तीचा उत्सव असल्याने आजारी कुमकुवत महिलांनी लहान मुलांनी उपवासाचा हट्ट करू नये  घरातील महिला सुदृढ राहिली तरच पूर्ण घर समाधानी आणि सुदृढ राहणार आहे त्यामुळे स्त्रियांनी उपवासाचा आग्रह धरू नये त्यापेक्षा भक्ती भावाने उपासना नामस्मरण करावे उपासना केल्याने देवी नक्कीच प्रसन्न होणार आहे. या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम!!   
 
*सौ. स्वाती भाऊसाहेब फुलारी*,
श्री देवीचामाळ, करमाळा.

error: Content is protected !!