केम येथील महेश डोंगरे-पाटील यांना नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड जाहीर - Saptahik Sandesh

केम येथील महेश डोंगरे-पाटील यांना नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड जाहीर

केम (संजय जाधव): मैत्री पीस फाउंडेशन, मुंबई आणि वर्मा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड वितरण सोहळ्यात केम (तालुका करमाळा) येथील महेश डोंगरे-पाटील यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्काराबद्दल केम ग्रामस्थांच्या वतीने डोंगरे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच प्रतिनिधी राहुल आबा कोरे, व्यापारी विजय दौंड, बबलू पाटील, विश्वजीत दौंड, अवधूत कदम, भाऊ सातपुते, संदिप गोडसे, रमेश तळेकर आदी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना महेश डोंगरे पाटील म्हणाले, “केम ग्रामस्थांच्या वतीने माझा सन्मान करण्यात आला, त्याबद्दल मी केमकरांचा ऋणी राहील. केम गावच्या विकासासाठी यापुढेही प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.”

error: Content is protected !!