ब्रह्मचैतन्य विद्यागिरी महाराज यांची पुण्यतिथी धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न

केम(संजय जाधव): ब्रह्मचैतन्य विद्या गिरी महाराज यांच्या २० व्या पुण्यतिथीनिमित्त ७ ऑक्टोबर रोजी केम येथील श्री उत्तरेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अभिषेक, कीर्तन, पुष्पवृष्टी आणि महाप्रसाद वाटप अशा भक्तिमय वातावरणात पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. अशी माहिती श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि महंत जयंतगिरी महाराज यांनी दिली.

पुण्यतिथीनिमित्त सकाळी ८ ते १० या वेळेत सर्व समाधीस्थळांसह श्री उत्तरेश्वर देवस्थान येथे अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ह.भ.प. अनिरुद्ध महाराज निंबाळकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या धार्मिक सोहळ्यास महाराष्ट्रातील विविध आखाड्यांतील साधू-महंत उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट, महंत जयंतगिरी महाराज आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!