समरसता साहित्य परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दिनेश मडके

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२३:समरसता साहित्य परिषदेच्य जिल्हा शाखेच्या नूतन कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला असून, करमाळा येथील सा. पवनपुत्रचे संपादक दिनेश उद्धवराव मडके यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


‘सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक’ हे ब्रीद घेऊन सामाजिक समरसता आणि वैचारिक प्रबोधनासाठी कार्यरत असलेल्या या परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. माधव कुलकर्णी यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. महिला आयाम प्रमुखपदी डॉ. दुर्गा जोशी, कार्यवाहपदी दत्तात्रय इंगळे, तर उपाध्यक्षपदी सुधाकर कवडे आणि दिनेश मडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील, प्रदेश सहकार्यवाह सुहास घुमरे आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष जगन्नाथ हुक्केरी यांनी या निवडी जाहीर केल्या.
दिनेश मडके हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. साप्ताहिक पवनपुत्रच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यिक विषयांना सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तसेच अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत.
