श्री देवीचामाळ येथे विवाहितेची आत्महत्या…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सासरच्या मंडळीकडून छळ होत असल्याने श्रीदेविचामाळ (करमाळा) येथे एका २२ वर्षांच्या विवाहितेने आत्महत्या केली आहे, हा प्रकार १२ ऑक्टोबरला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी शरद रमेश राऊत रा.फक्राबाद (ता.जामखेड) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझी मुलगी प्रिती हिचा विवाह ज्ञानेश्वर रामा बनकर (गोमळवाडा, ता. शिरूर कासार, जि. बीड, सध्या रा. श्रीदेवीचामाळ) यांच्याबरोबर २७ एप्रिल २०१६ रोजी झाला. त्यानंतर ज्ञानेश्वर बनकर हा एस. टी. मध्ये चालक असून त्याच्या वारंवार बदल्या होत असे आणि घरी आल्यानंतर तो तसेच त्याची आई केशर रामा बनकर, दीर आप्पा रामा बनकर व जाऊ स्वाती आप्पा बनकर हे सर्वजण तिचा छळ करत होते.
या छळास कंटाळून तिने १२ ऑक्टोबरला रात्री नऊच्या सुमारास मारूती मंदिराजवळ, श्रीदेवीचामाळ येथे राहत असलेल्या घरी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.