मंगळवेढा येथे प्रा.गणेश करे-पाटील यांना “दिव्यांग साथी” विशेष सन्मान पुरस्कार प्रदान…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मंगळवेढा येथील श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ ही संस्था, आमची साथ…अपंगत्वावर मात…हे ब्रीद वाक्य घेवून दिव्यांग बालकांसाठी राज्यात प्रसिद्ध आहेत, या ‘संस्थेच्या ३३ वा वर्धापन दिन” निमित्त करमाळ्यातील यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांना दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल दिव्यांग साथी या विशेष सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ मंगळवेढा संस्थेचे सचिव चित्रसेन पाथरूट सरांच्या शुभहस्ते व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागनाथ पाथरूट, जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, नागनाथ मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक हिरालाल नाळे, करुणा मतिमंद शाळा मंगळवेढा शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र हेंबडे, नागनाथ मूकबधिर निवासी विद्यालय बाभुळगाव शाळेचे मुख्याध्यापक मधुकर भोसले व मूकबधिर मुलांची निवासी शाळा मंगळवेढा शाळेचे मुख्या ध्यापक मेघशाम सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.