वरकुटे येथील पावणेपंधरा वर्षाच्या मुलीस फुस लावून पळविले..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

कमाळा : वरकुटे येथील पावणेपंधरा वर्षाच्या मुलीस अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावुन पळवून नेले आहे. हा प्रकार १८ मे च्या मध्यरात्री घडला आहे. यात मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे, की मी व माझे पती केम येथे वीटभट्टीवर कामाला आहोत. तर माझी १४ वर्षे १० महिने वयाची मुलगी वरकुटे येथे आजोबा जवळ असते. १८ मे ला मध्यरात्री या मुलीस अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!