विहिरीवरील मोटर का चालू केली म्हणून चौघांकडून मारहाण..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : विहिरीवरील मोटर का चालू केली. या कारणावरून सख्ख्या भावाने सख्ख्या भावास अन्य तिघांच्या मदतीने काठ्याने, काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार ७ जुलैला रात्री साडेआठ वाजता उमरड येथे घडला आहे. या प्रकरणी दत्तु बिरा लोखंडे रा. उमरड यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की ७ जुलैला रात्री साडेआठ वाजता मी जेवण करून घराबाहेर बसलो असताना तेथे माझा भाऊ हरी बिरा लोखंडे, देविदास बिरा लोखंड, दादा हरी लोखंड तसेच ऋतिक देविदास लोखंडे (सर्व रा. उमरड) हे आले व तु मोटर का चालू केली असे म्हणून हातातील कु-हाडीने तसेच काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार चेतन पाटील हे करत आहेत.