अवैध दारू, गुटखा विक्रेते व जुगार खेळणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी – घारगाव मधील ग्रामस्थांची मागणी

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – घारगाव (ता.करमाळा) ग्रामपंचायतीच्या वतीने २३ जून रोजी घेण्यात आलेल्या मासिक ठराव बैठकीत गावात अवैध दारू, गुटखा विक्रेते व जुगार खेळणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार काल (दि.१४ जुलै) घारगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस अधीक्षक सोलापूर यांना अशा अवैध गोष्टींवर कारवाई करावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

ग्रामपंचायत घारगाव कार्यालय परिसर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरामध्ये गावातील काही लोक दारू पिऊन काचेच्या बाटल्या फोडतात. तसेच गुटखा व तंबाखू खाऊन परिसर अस्वच्छ करतात. गावातील सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळला जातो. त्यामुळे काचा लहान मुले व अन्य नागरिकांना लागून जखमा होण्याची शक्यता आहे. शाळेच्या परिसरात होरंड्यात बसून दारू पितात गुटखा व तंबाखू खाऊन तेथेच थुकतात. अशा नागरिकांवर नियमाप्रमाणे ठोस कार्यवाही व्हावी सदरच्या बेकायदेशीर गोष्टीवर ग्रामपंचायत मार्फत कार्यवाही करावी असा लेखी अर्ज ग्रामस्थ श्री रमेश निवृत्ती होगले यांनी दिला. त्यावर ग्रामपंचायतीच्या मासिक ठराव बैठकीत चर्चा करण्यात आली. दारूमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत चाललेले आहेत तसेच गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होऊन बरबाद होत चाललेली आहे. त्यामुळे सदरच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करावी आणि गावातील अवैद्य दारू व गुटखा विक्री बंद व्हावी अशी ग्रामपंचायतिच्या वतीने मागणी पोलीस अधीक्षक सोलापूर यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!