करमाळ्यात मटका घेणाऱ्यावर गुन्हा दाखल
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : शहरातील पर्णकुटी भागात कल्याण नावाचा मटका घेणाऱ्या प्रौढावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २३ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की करमाळा शहरातील कचेरी रोडवर पर्णकुटीच्या मागे राजू दत्तात्रय दुधाळ हा कल्याण नावाचा मटक्याच्या चिठ्ठ्या फाडताना आढळून आला. त्याच्याकडे रोख ९५० रूपये, पांढऱ्या रंगाची स्लिप व निळ्या शाईचा बॉलपेन सापडला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.