विहाळ येथील सरस्वती करे यांचे निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : विहाळ (ता.करमाळा) येथील सरस्वती नवनाथ करे यांचे अल्पशा आजाराने 7 जुलै 2024 रोजी पहाटे 2.19 वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 67 वर्षे होते. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
सरस्वती करे यांना सर्वजण “सरसा ऊर्फ काकू” या नावाने ओळखतात. लहानपणापासूनच त्यांना आध्यात्माची आवड होती. स्नेहशील व मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी सर्वांची मने जिंकली होती.
बालपणीच मातृछत्र हरपलेल्या सरस्वती करे यांच्या वाट्याला आयुष्यभर संघर्षच आला; परंतु त्यांनी हार न मानता काबाडकष्टाने आपला संसार उभा केला. त्यासाठी वेठबिगारीसह शेतातील कामे करत त्यांनी कपडे शिवण्याची कलाही आत्मसात केली होती. कालांतराने पिठाची गिरणीही चालवू लागल्या. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. ज्येष्ठ पत्रकार योगिराज करे, अंगणवाडी सेविका सविता देवकते व पोलिस कर्मचारी किरण करे यांच्या त्या मातुःश्री होत.