विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींवर चर्चा करण्यासाठी प्रा. झोळ यांनी घेतली जरांगे-पाटील यांची भेट
केम (संजय जाधव) – दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक अडचणींविषयी तसेच एस बी सी, एस ई बी सी ,ओबीसी, एनटी समाजाच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी विषयी प्रा.झोळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली.
खालील मागण्या जरांगे-पाटील यांनी शासनाकडे कराव्या अशी विनंती प्रा. झोळ यांनी केली –
- बहुजन समाज कल्याण विभागाने दि.१४ जून २०२४ रोजी १५५४ अभ्यासक्रमांना अनुसूचित जातीप्रमाणे OBC ,NT(A,B,C,D),SBC यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे परंतु SEBC,OPEN EWS चे विद्यार्थी यातून वगळले आहेत तरी या SEBC, OPEN EWS विद्यार्थ्यांना १५५४ च्या अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती मिळावी.
- SEBC, OBC व इतर सर्वच जातींना जात पडताळणी प्रमाणपत्र प्रवेशावेळी सादर करावे लागते हे प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिने वाढवण्यात यावी.
- १०० % फी माफी ही सरसकट सर्व मुलींना देण्यात यावी सध्याच्या शासन निर्णया नुसार OPEN प्रवर्गातील मुलींना वगळण्यात आले आहे. यामध्ये OPEN प्रवर्गातील मुलींचा देखील समावेश करण्यात यावा
- ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सरसकट वस्तीगृह भत्ता देण्यात यावा सध्या प्रत्येक जिल्ह्यासाठी ६००विद्यार्थ्यांना देण्याची भत्ता देण्याची तरतूद शासनाच्या पत्रकात आहे. हा नियम बदलून OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट वसतिगृह भत्ता देण्यात यावा यामुळे आता कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.