निंभोरे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

केम (संजय जाधव) – काल (दि.१८) निंभोरे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे नगर येथील युवकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिपज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.दीपक गवळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि नितीन गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी गावचे लोकनियुक्त सरपंच रविदादा वळेकर,पोलिस उपनरीक्षक हनुमंत वाघमारे साहेब, ग्रा.पं.सदस्य धनंजय वळेकर,ग्रा.पं.सदस्य अण्णा सावंत, ग्रा.पं.सदस्य दीपक गवळी,आर.व्ही. ग्रुप चे अध्यक्ष पप्पु मस्के,भाऊसाहेब वाघमारे,गवळी परिवार,खाडे परिवार,चांदणे परिवार,शिंदे परिवार,भिसे परिवार,अडसूळ परिवार,गायकवाड परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



