पांगरे येथील सुवर्णा गुरव यांचे अपघाती निधन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – पांगरे येथील सुवर्णा राजेंद्र गुरव (वय-55) यांचे 18 जुलैला अपघाती निधन झाले आहे.
हा अपघात 18जुलै ला सुरवड (ता.इंदापूर) येथे पंढरपूर वरुन येताना झाला. छोटा टेंम्पो पलटी झाल्याने त्या गंभीर जखमी होवून त्यांचे निधन झाले.
सौ. गुरव त्यांचे चिरंजीव किर्तनकार हर्षद गुरव यांच्यासोबत पंढरपूर येथे गेल्या होत्या. यात्रेहून परत येताना रस्त्यावर आडव्या आलेल्या मोटरसायकलस्वरास वाचवताना टेम्पो पलटी झाला.त्यात सौ. गुरव गंभीर जखमी होऊन त्यात त्यांचे निधन झाले.भैरवनाथ देवाचे पुजारी श्री रांजेंद्र त्यांच्या मागे पती ,दोन मुले ,सुना,सासू सासरे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ह. भ. प.प्रसिद्ध कीर्तनकर हर्षद महाराज गुरव यांच्या त्या मातोश्री होत्या.


सदर प्रमाणपत्रासाठी खालील कागदपत्रे व अटी दिलेल्या आहेत –

