करमाळ्याचा कोहिनूर झळकतोय महाराष्ट्रात!

जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा – कोहिनूर
जो सूर्यप्रकाशात देखील झळाळतो आणि तो अंधारातही वाट दाखवतो… असाच एक करमाळ्याच्या मातीतील कोहिनूर हिरा महाराष्ट्रात झळकतोय तो म्हणजे मंगेश नरसिंह चिवटे.

त्यांचं बालपण करमाळ्याच्या मातीत गेलं. तिथेच त्यांच्या मूल्यांची पाळंमुळं रूजली. पुण्याच्या S.P. कॉलेजमध्ये शिक्षणाचं रोपटं बहरलं. B.Ed, LLB, पत्रकारिता अशी शैक्षणिक शिखरं गाठलेला हा युवक, दिल्लीच्या गजबजाटात IAS होण्याचं स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करत होता. मात्र लेखणीच्या आणि वक्तृत्वाच्या ताकदीवर समाज परिवर्तन करायचं ठरवलं. Star Maza, Jai Maharashtra, Saam, IBN Lokmat या वाहिन्यांवर प्रभावी व्यासपीठ उभारलं – पण मन मात्र अखेर जनसेवेच्या दिशेने वळलं.

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीने मंगेश चिवटे प्रभावित झाले. त्यांच्यासोबत काम करत त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हजारो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मदतीचा आधार दिला. त्यांच्या प्रयत्नांतून सुमारे ६००० बालकांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर आरोग्य सेवेसाठी अंदाजे ४२५ कोटी रुपयांची मदत झाली. ही केवळ आकडेवारी नसून, गरजूंना वेळेवर मदतीचा हात मिळावा यासाठी केलेली एक संवेदनशील कृती आहे.

रक्तदान शिबीर असो, अपघातग्रस्तांची मदत असो, उपोषण असो की राजकीय तिडा असो मंगेश चिवटे यांची उपस्थिती असते. त्यांची उपस्थिती म्हणजे “जिवंत आश्वासकता”! मंगेश चिवटे हे नाव “माणसासाठी झगडणारा माणूस “अशीच ओळख ठरते. ते फक्त एक कार्यकर्ते नाहीत, ते एका चळवळीचं नाव आहेत – जे “माणूसपणाच्या शपथेवर” उभं राहिलं आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, परळच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये – २५०० रुग्णांसाठी अन्न व औषध सेवा दिली आहे. ही त्यांच्या कर्माची पूजा, आणि माणुसकीची महापूजा ठरते.
त्यांचे आजोबा – स्वातंत्र्यसैनिक, नगराध्यक्ष आणि निर्भीड पत्रकार –मनोहरपंत चिवटे. हा वारसा ते अत्यंत तळमळीने चालवत आहेत त्यांच्या रक्तात पत्रकारितेचं धारदार लिखाण आहे, आणि मनात सामान्य जनतेच्या दु:खावरील मलम आहे.

आगामी काळात शिक्षक मतदारसंघातून मंगेशजीना उमेदवारी मिळावी, ही अनेकांची अपेक्षा आहे. कारण ते केवळ पदासाठी कार्यरत नाहीत, तर समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
त्यांचं कार्य हे राजकारणापुरतं सीमित न राहता लोकसंग्रहावर आधारित आहे. म्हणूनच अनेकांच्या मते, त्यांना उमेदवारी मिळाल्यास विजय निश्चित आहे. करमाळ्याचे प्रतिनिधित्व अधिक सक्षमपणे होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतो.
मंगेश नरसिंह चिवटे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!
✍️ डाॅ. ॲड. बाबूराव हिरडे, करमाळा. मो.न, 9423337480




