शेतजमिनीच्या वादातून गॅरेज चालकावर हल्ला -

शेतजमिनीच्या वादातून गॅरेज चालकावर हल्ला

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : जुन्या शेतजमिनीच्या वादातून गॅरेज चालक नितीन नामदेव मुसळे (वय ३६, रा. वडगाव द., ता. करमाळा) यांच्यावर तिघांनी हल्ला केल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी पहाटे एकच्या सुमारास करमाळा शहरातील दत्त मंदिराच्या पाठीमागील ३६ एकर परिसरात घडली.

योगेश शोभा मुसळे, रोहित बंडू मुसळे आणि बंडू रंगनाथ मुसळे यातील योगेश मुसळे याने शिवीगाळ करून लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रोहित मुसळे याने काठीने पाठीवर मारहाण केली, तर बंडू रंगनाथ मुसळे याने चाकूने डाव्या हाताच्या पंजावर वार करून जखमी केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने नितीन मुसळे खाली पडले. . जखमी अवस्थेत त्यांनी उपजिल्हा रुग्णालय, करमाळा येथे उपचार घेतल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!