जेऊरमध्ये लॅपटॉपची चोरीला

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२८:
जेऊर येथे घरातून ₹60 हजार किंमतीचा एचपी कंपनीचा लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रोहिणी सुरेश राऊत (वय 38, रा. जेऊर, ता. करमाळा) यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले, की 31 मे रोजी रात्री मुलगा आदित्यने अभ्यास करून लॅपटॉप बेडवर ठेवला होता. 4 जून रोजी सायंकाळी मुलाने लॅपटॉपबाबत विचारणा केली असता घरभर तसेच परिसरात शोध घेऊनही तो मिळून आला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने घरातील एचपी कंपनीचा काळ्या रंगाचा (मॉडेल 15-FA2703TX) सुमारे ₹60 हजार किंमतीचा लॅपटॉप चोरून नेला आहे.
या प्रकरणात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!