भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त बिटरगाव (श्री )येथे भव्य कीर्तन महोत्सव सुरु

करमाळा / संदेश प्रतिनिधी
बिटरगाव श्री (ता. करमाळा) येथे भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या कीर्तन महोत्सवाची सांगता ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार सहभागी होत असून, दररोज कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक विचारांची मेजवानी मिळत आहे.

या महोत्सवामध्ये ३० ऑक्टोबर रोजी अक्रूर महाराज साखरे यांचे कीर्तन, तर विलास महाराज शिंदे यांचे प्रवचन झाले. ३१ ऑक्टोबर रोजी अर्जुन महाराज मोठे यांचे कीर्तन व हनुमंत महाराज कराळे यांचे प्रवचन झाले. १ नोव्हेंबर रोजी तुळशीराम महाराज काळे यांचे प्रवचन, तसेच ह.भ.प. नेहा ताई भोसले यांचे कीर्तन झाले.
२ नोव्हेंबर रोजी कविराज महाराज झावरे (संगमनेर) यांचे कीर्तन, तर डॉ. ॲड. बाबुराव हिरडे यांचे प्रवचन होणार आहे. ३ नोव्हेंबर रोजी पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन व प्रवचन ॲड. प्राची सरवदे यांचे होणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी विशाल महाराज खोले यांचे कीर्तन व राधाताई भांडवलकर यांचे प्रवचन होईल.
५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन, तर जय श्रीराम महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. महोत्सवाच्या सांगतेनिमित्त ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत सोपान महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संपूर्ण कीर्तन महोत्सवाचे आयोजन डॉ. अभिजित मुरूमकर व बिटरगाव श्री ग्रामस्थ मंडळी यांनी केले आहे. या महोत्सवाच्या व्यासपीठाचालक नाना महाराज पठाडे हे आहेत.परिसरातील भाविकांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
