संत नामदेव महाराज व संत सावतामाळी महाराज पुण्यतिथीनिमित्त करमाळ्यात अखंड हरिनाम सप्ताह

0

करमाळा : करमाळा शहरातील श्री विठ्ठल मंदिर, गुजर गल्ली येथे संतश्रेष्ठ नामदेव महाराज व संत सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात दररोज पहाटे काकडा, नामदेव गाथा व संत सावता महाराज चरित्र ग्रंथ पारायण, महिला भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन तसेच हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

सप्ताहादरम्यान राज्यातील विविध भागांतील नामवंत ह.भ.प. प्रवचनकार व कीर्तनकार यांची सेवा भाविकांना लाभणार आहे. १० ऑगस्ट रोजी संत नामदेव महाराज पुण्यतिथी कीर्तन, तर ११ ऑगस्ट रोजी संत सावतामाळी महाराज पुण्यतिथी कीर्तन व पालखी सोहळ्याने सप्ताहाची सांगता होणार आहे.

या धार्मिक सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर भजनी मंडळ, गुजर गल्ली, करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!