पहाटे फिरायला गेलेल्या वृद्धाची सोन्याची अंगठी हिसकावली
करमाळा/ संदेश प्रतिनिधी :

करमाळा ता. ९ : पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या अशोक नेमचंद दोशी यांच्या हातातील सोन्याची अंगठी तीन अनोळखी चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून घेतली आणि मोटारसायकलवरून जेऊरच्या दिशेने पळ काढला. दोशी यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे न थांबता पसार झाले.

ही घटना करमाळा-जेऊर रोडवरील विश्रामगृहाच्या पाटीजवळ रविवारी (दि. ९ ऑगस्ट) पहाटे सुमारे ५ वाजता घडली. या घटनेत सुमारे ६३ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरीस गेली आहे.



